आज श्रावणाचा पहिला दिवस, अंबाबाईच्या मंदिरात गर्दी, मंदिराचा परिसर गजबजला!

| Updated on: Jul 29, 2022 | 12:37 PM

आज शुक्रवार आणि श्रावण महिन्याची सुरुवात त्यामुळे भाविकांनी अंबाबाईच्या मंदिरात (Ambabai Temple) गर्दी केलीये. मंदिराचा सगळा परिसर भाविकांनी गजबजून गेलाय.

Follow us on

महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना (Shravan Month) सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या (Lord Shiva) आराधनेला विशेष महत्त्व आहे. शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना आज 29 जुलै 2022 पासून सुरू झाला असून 26 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्रावण काळ हा कुठल्याही देवाच्या दर्शनासाठी उत्तम मानला जातो. कोरोना काळात सगळीकडेच निर्बंध होते. मंदिरात सुद्धा भाविकांवर निर्बंध होते, खरं तर या काळात मंदिरंच बंद होती. आता सगळे निर्बंध हटविण्यात आली आहेत. आज शुक्रवार आणि श्रावण महिन्याची सुरुवात त्यामुळे भाविकांनी अंबाबाईच्या मंदिरात (Ambabai Temple) गर्दी केलीये. मंदिराचा सगळा परिसर भाविकांनी गजबजून गेलाय.