Today Petrol, Diesel Rate : महागाईचा फटका, सीएनजीच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल, डिझेलची काय स्थिती?

| Updated on: Aug 03, 2022 | 9:26 AM

21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले. जाणून घ्या..

Follow us on

मुंबई : राशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चा तेलाचे दर गगनाला भिडले होते, तेव्हा देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. तर आता कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घसरणीनंतर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरवर पोहोचले आहेत. यातच देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rate) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलेच दर स्थिर आहेत. देशात इंधनाचे दर कमी न करता स्थिरच ठेवण्यात आले आहेत.