VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 January 2022
पश्चिम बंगालमध्ये शाळा, सगळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित ही स्थिती राज्यातही अशीच राहिली, राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल. पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला, तसाच निर्णय मुख्यमंत्री लवकरात लवकर घेण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये शाळा, सगळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित ही स्थिती राज्यातही अशीच राहिली, राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल. पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला, तसाच निर्णय मुख्यमंत्री लवकरात लवकर घेण्याची शक्यता आहे. ती चर्चाही झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलांचं लसीकरण करणं हे आवश्यक होतं. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण झालं की त्याच्या खालीही जाता येईल. पालकांनी आपल्या पाल्यांचं लवकरात लवकर लसीकरण करून घ्याव. कोणतीही हयगय करू नये. त्याचा कोणताही साईट इफेक्ट नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
