ग्रामपंचायतींवर कोणाची बाजी? कोणाची सरशी? कोणी उधळला गुलाल? पहा यासंदर्भातील बातम्या टॉप 9 न्यूज

| Updated on: Oct 17, 2022 | 8:48 PM

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतींच्या निकालावरून वक्तव्य केलं आहे. आम्ही हवेत दावे करत नाही. तर कोणत्या ग्रामपंचायतीत कोण किती मतांनी निवडणून आलं आहे. याची माहिती आपल्याकडे असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow us on

राज्यातील 1165 ग्रामपंचायतींचा निकाल आज हाती आला. यानिकालानंतर राज्यात भाजप नंबर वनवर असलेला पक्ष असल्याचेच सिद्ध झाले आहे. तर भाजप आणि महाविकास आघाडीत सरशी दिसून आली. तर हाती आलेल्या आतापर्यंतच्या निकालावरून 451 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. तर 352 ग्रामपंचायतींवर भापज-शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतींच्या निकालावरून वक्तव्य केलं आहे. आम्ही हवेत दावे करत नाही. तर कोणत्या ग्रामपंचायतीत कोण किती मतांनी निवडणून आलं आहे. याची माहिती आपल्याकडे असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान 1165 ग्रामपंचायतींचा निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने 155 ग्रामपंचायती आपली सत्ता आणली आहे. तर गुहागरच्या पाचही ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाची सत्ता आली आहे.