Pahalgam Attack : ‘काश्मीर एक जन्नत…’, दहशतवादी हल्ल्यानंतरही पहलगाम पर्यटकांनी फुललं, बघा सध्या माहौल कसा?

Pahalgam Attack : ‘काश्मीर एक जन्नत…’, दहशतवादी हल्ल्यानंतरही पहलगाम पर्यटकांनी फुललं, बघा सध्या माहौल कसा?

| Updated on: Apr 25, 2025 | 6:15 PM

काश्मीरमधील पहलगाममधील घनदाट जंगलांनी वेढलेल्या मनमोहक बैसरन व्हॅली भागात मंगळवारी (22 एप्रिल 2025) काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर मनात भिती घेऊन आगामी बुकिंग असलेल्या पर्यटकांनी ते रद्द केल्याचे पाहायला मिळत आहे.

पहलमागमधून एक बातमी समोर येत आहे. नुकत्याच दहशतवादी हल्ल्यानंतरही पहलगाम हे पर्यटकांनी चांगलंच फुलल्यांचं दिसतंय. पहलगाम येथील सेल्फी पॉईंटवर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, यावेळी कोलकत्या येथून पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांशी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही असुरक्षित वाटलं का? असा सवाल केला असता महिला पर्यटकाकडून सुरक्षित वातावरण असल्याची भावना व्यक्त केली. पुढे त्या असंही म्हणाल्या की, ‘जम्मू काश्मीर मधील काही पर्यटन स्थळांना आम्ही भेट देऊन आलो आणि आता पहलगाम येथे आहोत आणि आशा आहे की पहलाममध्ये चांगल्या प्रकारे आम्ही फिरू…’, असं त्यांनी सांगितलं. तर आर्मीतील एका निवृत्त कर्मचाऱ्याने असे म्हटले की, ‘काश्मीरच्या लोकांनी खूप प्रेम दिलं आहे. पर्यटकांना एकच आवाहन आहे की, बुकिंग केलं असेल तर रद्द करू नका… कोणाच्या भितीच्या अफवांना बळी पडू नका.’

Published on: Apr 25, 2025 06:15 PM