Anil Parab | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या, अनिल परब यांची माहिती

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 6:25 PM

राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. महागाई भत्ता, घरभाडे वाढीचा प्रश्न मार्गी लावलाय. वेतनवाढीचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवणार असल्याचं परब यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी कामावर यावं, दिवाळी आहे, असं आवाहन परब यांनी केलंय.

राजकीय पक्षाने या आंदोलनास आता साथ दिली आहे. परंतू 87 टक्के कामकाज सुरु झालंय. 28 डेपो बंद आहेत. भावना भडकावण्याच्या आमिषाला बळी पडू नका. आत्महत्या करु नका. कर्मचारी कामावर येऊ पाहत आहेत, पण काहीजण त्यांना अडवत आहेत. दिवाळी असल्यानं कुणावरही कारवाई करणार नाही. मात्र, अजून कारवाई केली नसली तरी पुढे विचार करावा लागेल. बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशाराही परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.