Trupti Desai : वाल्मिक कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाई यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाल्या?

Trupti Desai : वाल्मिक कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाई यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Apr 14, 2025 | 6:13 PM

कराडला संपवण्याचा कट हा मागच्या वेळी शिजला होता. कासले यांनी सुपारी दिली होती की नाही माहिती नाही, पण कराडला जेलमध्ये संपवलं जाऊ शकतं हे कानावर आल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडे वाल्मिक कराडमुळे अडचणीत आले आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी कदाचित धनंजय मुंडे किंवा त्यांच्या जवळचे लोक वाल्मिक कराडला संपवू शकतात. धनंजय मुंडे गटच वाल्मिक कराडला संपवू शकतो, असा मोठा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय. इतकंच नाहीतर वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो. या आधीही मी सांगितले होते की वाल्मिक कराडचा खून होऊ शकतो. स्लीप एपनिया नावाचा आजार वाल्मिक कराडला आहे. या आजारामध्ये व्यक्तीचा झोपेतच श्वास बंद होतो. त्यामुळे त्याला मारलं जाऊ शकतं किंवा कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत सापडला असे सांगितले जाऊ शकतात, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं, पुढे त्या असंही म्हणाल्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रमुख आहे. त्यामुळे राजकीय पदावर असणारे मोठे मोहरे अडचणीत येऊ शकतात, म्हणून वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं, असा दावाही तृप्ती देसाई यांनी केला. जर बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांना कराडच्या एन्काऊंटरची सुपारी दिली असेल तर ती कोणी दिली? कधी दिली? का दिली? याची चौकशी करून सुपारी देणाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले.

Published on: Apr 14, 2025 06:13 PM