Chenab River : भारतानं ‘पाक’चं पाणी रोखलं अन् खळखळून वाहणाऱ्या ‘चिनाब’ची अवस्था नाल्यासारखी, बघा विदारक दृश्य
India blocks Chenab River Flow : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला आणि चिनाब नदीला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबला. जिथे एकेकाळी पाण्याचा खळखळाट होता तिथे आता पाणी नाल्यासारखे वाहतांना दिसतंय.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात ‘वॉटर स्ट्राईक’ केल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतोय. दरम्यान भारताने पाकिस्ताचं पाणी रोखल्यावर चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी खळखळून वाहणाऱ्या चिनाब नदीची आवस्था ही आता नाल्यासारखी झाल्याचे विदारक दृश्य समोर आले आहे. चिनाब नदी पूर्णतः सुखली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा ६५ वर्ष जुना सिंधू जल करार स्थगित करण्याचा कठोर निर्णय घेतला. भारताने बागलिहार धरणाचे दरवाजे बंद केले आहेत. यामुळे चिनाब नदीचे पाणी पाकिस्तानकडे वाहणे थांबले आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या पाणी वादाला आणि तणावाला नवं वळण मिळाले आहे. पाकिस्तान हा देश चिनाब नदीचे पाणी प्रामुख्याने सिंचन आणि पिण्यासाठी वापरतो. मात्र भारताने पाकविरोधात भूमिक घेत सिंधू जल करार स्थगित केला. या निर्णयानंतर, पाकिस्तान आता पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेला दिसतोय. बघा चिनाब नदी पात्रातून tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
