कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असताना ३ गुन्ह्यांची चर्चा, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 27, 2023 | 11:33 PM

कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुका, उमेदवारांची निवड असो. प्रचार असो की मग आरोप-प्रत्यारोपांनीही चांगल्याच गाजल्या... बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

पुणे : कसब्याची पोटनिवडणूक मतदानाआधी जशी गाजली तशीच ही निवडणूक मतदानानंतरही चर्चेत आली आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे. पण निकालाआधी निवडणूक आयोगानं दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना जोरदार दणका दिला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबर यांच्याविरूद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजपचे उमेदवार हेमंत रासने भाजपचं कमळ चिन्ह असलेलं उपरणं घालून मतदान केंद्रावर आले. तर रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप करून उपोषण केले होते, त्यातून आचारसंहितेचा भंग त्यांनी केला होता. तर रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा फोटो व्हायरल करून मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली. कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुका, उमेदवारांची निवड असो. प्रचार असो की मग आरोप-प्रत्यारोपांनीही चांगल्याच गाजल्या. दोन्ही ठिकाणी जवळपास 50 टक्के मतदान झालंय. आता निकाल काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.