Ahmedabad Plane Crash : माझा मुलगा गेला… दोन दिवसांपूर्वी घरचांच्या इच्छेनं कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना… घटनेनं बाप हादरला

Ahmedabad Plane Crash : माझा मुलगा गेला… दोन दिवसांपूर्वी घरचांच्या इच्छेनं कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना… घटनेनं बाप हादरला

| Updated on: Jun 14, 2025 | 11:38 AM

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात वडोदरा येथील भाविक माहेश्वरी यांचाही मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की त्यांचे लग्न दोन दिवसांपूर्वीच झाले होते आणि कुटुंब आनंद साजरा करत होते. परंतु या अपघातानंतर घर शोकाकुल झाले आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गुजरातच्या वडोदराच्या २६ वर्षीय भाविक माहेश्वरीचाही मृत्यू झाला. त्याचे लग्न दोन दिवसांपूर्वीच कुटुंबाच्या आग्रहास्तव घाई-घाईत कोर्ट मॅरेज झाले होते आणि कुटुंब आनंद साजरा करत होते. मात्र त्याच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुजरातमधील वडोदरामध्ये राहणारे एक कुटुंब १५ दिवसांपूर्वीच लंडनहून भारतात आलेल्या मुलाच्या भेटीनं आनंदी होते.

भाविक माहेश्वरी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत होता. तो दरवर्षी १५ दिवसांसाठी वडोदरा येथे यायचा. पण यावेळी त्याच्या कुटुंबाने त्याला लग्न करून परत लंडनला जाण्यास सांगितले. भाविकचे आधीच साखरपूडा झाला होता आणि आता भारतात आल्यानंतर त्याने कोर्ट मॅरेजद्वारे लग्न केले होते, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Published on: Jun 14, 2025 11:36 AM