Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकींची रेकी, पाठलाग करणारे दोघं कोण?
Zeeshan Siddique Stalking : माजी आमदार झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. झिशान सिद्दीकींची रेकी केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून 2 व्यक्ती झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत त्यांची रेकी करत असल्याची अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या दोघांना निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली. कार्यकर्त्यांना संशय आल्यानंतर या दोघांना ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मात्र चौकशीनंतर पाठलाग करणाऱ्या या दोघांना सोडून देण्यात आल्याचं उघड झालं आहे.
दरम्यान, झिशान सिद्दीकी यांचे वडील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच झिशान सिद्दीकींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
