Uday Samant | राज्याच्या विकासासाठी फडणवीस-मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ? : उदय सामंत

Uday Samant | राज्याच्या विकासासाठी फडणवीस-मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ? : उदय सामंत

| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 7:21 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल 15 मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेवर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल 15 मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेवर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राला हीच चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा चर्चा अपेक्षित आहेत. दोघांमध्ये भेट झाल्याचं मी वर्तमानपत्रांमध्ये मी ऐकलं आहे. विकासाबद्दल चर्चा झाली असेल तर महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे, असं सामंत म्हणाले.