Uday Samant Reaction After Attack | सहनशिलतेचा अंत पाहू नका, गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Aug 03, 2022 | 12:01 AM

मला ते समोर येऊन शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला एक 50 - 60 जणांचा मॉब होता. डाव्या बाजूला एसपीओ माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो होते. त्याबाजूला दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होत, त्यांच्या हातात सळईसारखं काही होतं.

Follow us on

पहिली गोष्ट म्हणजे काहीजण सांगत आहेत की त्यांनी माझा ताफा अडवला. ते धादांत खोटं आहे. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. मी कुठेही घाई न करता मी तिथे थांबलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यातून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हाता. बेस बॉलची स्टिक होती, एकाच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते समोर येऊन शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला एक 50 – 60 जणांचा मॉब होता. डाव्या बाजूला एसपीओ माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो होते. त्याबाजूला दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होत, त्यांच्या हातात सळईसारखं काही होतं.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा प्रकार केला ते दुसऱ्या लोकांना शुटिंग करा म्हणून सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करुन, गाडीवर चढून मला मारण्याचा प्रयत्न केला. मला आताच कळालं की काही चॅनेलवर बोलताना शिवसेनेचे काही नेते म्हणाले की मला याचा अभिमान आहे. जर अशी हत्यारं घेऊन मुलं एका लोकप्रतिनिधीवर हल्ला करत असतील आणि त्याचा काहींना अभिमान वाटत असेल तर महाराष्ट्रातील राजकारण कुठच्या थराला जातंय, हे आज जनतेला दिसत आहे, असं उदय सामंत हल्ल्यानंतर म्हणाले.