Eknath Shinde | उदयनराजेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, विकासकामांबाबत केली चर्चा

Eknath Shinde | उदयनराजेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, विकासकामांबाबत केली चर्चा

| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 8:03 PM

सातारा जावळीचे सुपुत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची दरे येथे सदिच्छा भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ आणि चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या गावी जात असताना खासदार उदयनराजे यांनी कोयना जलाशयातील तराफा चालवून मनमुराद आनंद लुटला.

सातारा : साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सातारा जावळीचे सुपुत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची दरे येथे सदिच्छा भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ आणि चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या गावी जात असताना खासदार उदयनराजे यांनी कोयना जलाशयातील तराफा चालवून मनमुराद आनंद लुटला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकास कामांबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली असल्याचे सांगितले आहे.