Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : बाळासाहेब, श्रीकांत ठाकरे इंग्रजी मीडियामध्ये शिकले, त्यांच्यावर संशय घ्याल? राज ठाकरेंनी उपटले टीकाकारांचे कान
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE: ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली या टीकेवर आज राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या घेतल्या.
आम्ही मराठी मीडियात शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकली आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. आज ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात बोलताना भाजपकडून होणाऱ्या टीकेवर राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेत उत्तर दिलं आहे. ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली मग मराठीचा पुळका का? अशी टीका सातत्याने केली जात असल्याने आज त्यावर राज ठाकरेंनी थेट भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. मग पुढे. दादा भुसे मराठीत शिकले मंत्री झाले. फडणवीस मराठीत शिकले मंत्री झाले. याचा काय संबंध? कुणाचे मुलं परदेशात शिकतात त्याच्या याद्या आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफरं येईल. असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आम्ही मराठी मीडियात शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकली आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे? असा खरमरीत टोला राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
