Uddhav Thackeray : ….म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सारंकाही सांगितलं अन् केला मोठा आरोप

Uddhav Thackeray : ….म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सारंकाही सांगितलं अन् केला मोठा आरोप

| Updated on: Apr 19, 2025 | 3:12 PM

'शिवसेना ही केवळ वापरा आणि फेकासाठी नाही. आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी ही शिवसेना आहे. मराठी माणसासाठी ही शिवसेना आहे. त्यात भेदाभेद होणार असेल तर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.', असंही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी दादर येथे आयोजित भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे सरकार पाडण्याचं कारण सांगत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं भाजपवाले विशेषता दिल्लीतील वरचे लोक फसवत आहेत, तेव्हा मी अरविंद सावंताना सांगितलं राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी कशासाठी वगैरे विचारले नाही. ते येस सर म्हणाले आणि राजीनामा दिला’, असे ठाकरेंनी सांगितले. पुढे त्यांनी असेही सांगितले, एक केंद्रीय मंत्री राजीनामा देतोय तरी सुद्धा पंतप्रधान किंवा त्यांच्या पक्षाध्यक्षांना ज्या पक्षाचा मंत्री राजीनामा देतोय त्याच्या पक्षाच्या प्रमुखाशी बोलावसं वाटलं नाही. तुम्ही का राजीनामा देत आहात हे विचारू शकले नाहीत. हेच तर भाजपचं जे काही मनातील काळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यांना अरविंद नकोच होता. कारण त्यांना बिल पास करायचं होतं. अरविंद त्याला विरोध करत होता. त्यामुळे तो गेलेला बरा. त्यावेळी त्यांनी अरविंदला थांबवलं नाही आणि ना मलाही फोन केला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  तर मी मुख्यमंत्री झाल्यावर मी ते बिल अडवलं. मग मी कसा चालेल, कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे आहेत. मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा. म्हणून त्यांनी माझं सरकार पाडलं. तुमचं सरकार पाडलं. काळ कृत्य करून त्यांनी तुमच्या हक्काचं सरकार या कारणाने पाडलं, असं पहिल्यांदाच ठाकरेंनी सरकार पाडण्यात आल्याचं सांगितले.

Published on: Apr 19, 2025 03:04 PM