Anaconda Controversy : अ‍ॅनाकोंडा vs भस्म्या झालेला अ‍ॅनाकोंडा, राजकारण पेटलं, बघा कोण काय म्हणालं?

Anaconda Controversy : अ‍ॅनाकोंडा vs भस्म्या झालेला अ‍ॅनाकोंडा, राजकारण पेटलं, बघा कोण काय म्हणालं?

| Updated on: Oct 28, 2025 | 5:35 PM

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना अ‍ॅनाकोंडाचा संबोधत केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शाहांनी मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरेंनी केला. यावर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आयत्या बिळावरचा नागोबा म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे.

उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अ‍ॅनाकोंडा असे संबोधत केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमित शाहांनी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर ठाकरेंनी हा हल्लाबोल केला होता. ‘अ‍ॅनाकोंडा’ म्हणजे सर्व काही गिळंकृत करणारा साप असून, शाह मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदेंनी उद्धव ठाकरेंना ‘भस्म्या रोग झालेला अ‍ॅनाकोंडा’ असे म्हणत, त्यांचे पोट कधीच भरत नाही अशी टीका केली. तसेच, ‘आयत्या बिळावरचा नागोबा’ असे संबोधत ठाकरेंनी मुंबई महापालिकेत, राज्यात आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद कसे मिळवले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या शाब्दिक युद्धामुळे राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

Published on: Oct 28, 2025 05:35 PM