Uddhav Thackeray : लाडक्या बहिणींनो पुढच्या 6 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार? ठाकरेंच्या मागणीचा सरकार विचार करणार?

Uddhav Thackeray : लाडक्या बहिणींनो पुढच्या 6 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार? ठाकरेंच्या मागणीचा सरकार विचार करणार?

Updated on: Oct 01, 2025 | 5:49 PM

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या मदतीसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी केली आहे.

राज्यात आलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे बळीराजा पुरता कोलमडून पडला आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांकडून सरकारडे तातडीची मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक नेते मंडळींनी पूरग्रस्त भागांचे दौरे करून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. शेतातील माती वाहून गेली तर खरीप हंगामातील कापूस सोयाबिन मका हे देखील उद्ध्वस्त झाले. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी विरोध पक्षासह शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी करत असताना लाडक्या बहिणींच्या हफ्त्याची देखील मागणी केली. निवडणुकीच्या वेळी दोन तीन वेळेचे हप्ते दिले होते. तसे आता सहा महिन्याचे हप्त लाडक्या बहिणींना द्या, असे ठाकरे म्हणाले.

Published on: Oct 01, 2025 05:49 PM