Uddhav Thackeray : तिसऱ्याची गरज नाही… मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray : तिसऱ्याची गरज नाही… मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

| Updated on: Aug 07, 2025 | 1:12 PM

उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते आज राहुल गांधी यांच्यासोबत डिनर देखील करणार आहेत. युतीसंदर्भात सवाल केला असता... जे करायचं ते करु. त्यात तिसऱ्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले...

युतीचा निर्णय आम्ही दोघे घेऊ, तिसऱ्याची गरज नाही, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. इतकंच नाहीतर युतीसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी-शर्ती नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, एकीकडे राज ठाकरेंसोबत युती करत असताना उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.

‘राज ठाकरेंबाबत दुसऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमचं बघू. इंडिया आघाडीत अटतटी नाही. राज आणि आम्ही निर्णय घेण्यात सक्षम आहोत.’, असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी युतीसंदर्भात वक्तव्य केलंय. दरम्यान, उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर असून आज ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण असल्याने ठाकरे कुटुंबीय जेवणासाठी गांधींच्या निवासस्थानी जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Aug 07, 2025 01:12 PM