उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
Uddhav Thackeray- CM Devendra Fadnavis Meet : विधान भवनाच्या बाहेर आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली दिसून आली.
निवृत्ती बाबर, प्रतिनिधी
ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने आज विधीमंडळात छोटा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे विधीमंडळात आलेले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली बघायला मिळाली आहे.
विधान भवनात सध्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आज या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली बघायला मिळाली आहे. या भेटीत काही मिनिटांचा संवाद आणि हसून गप्पा या दोघांमध्ये झाल्या. त्यानंतर हे दोन्ही नेते आपल्या मार्गाला लागल्याचं चित्र दिसून आलं. मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना हसून नमस्कार केलेला दिसला.
Published on: Jul 16, 2025 03:34 PM
