एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय ते उद्धव ठाकरेंनी पाहावं- नरेश म्हस्के
naresh mhaske

एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय ते उद्धव ठाकरेंनी पाहावं- नरेश म्हस्के

| Updated on: Nov 11, 2023 | 5:25 PM

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मुंब्र्यातील शाखेत उपस्थित आहेत. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय ते उद्धव ठाकरेंनी पाहावं असं नरेश म्हस्के म्हणतायत. नरेश म्हस्के म्हणालेत, "प्यार से बोलो प्यार देंगे!". आज मुंब्र्यात ठाकरे-शिंदे आमने सामने येणार आहेत. उद्धव ठाकरे मुंब्र्यासाठी रवाना झालेत.

मुंबई, 11 नोव्हेंबर 2023 | उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्र्यात आणि मुलुंड टोलनाक्यावर हे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. आता यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका रंगली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मुंब्र्यातील शाखेत उपस्थित आहेत. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय ते उद्धव ठाकरेंनी पाहावं असं नरेश म्हस्के म्हणतायत. नरेश म्हस्के म्हणालेत, “प्यार से बोलो प्यार देंगे!”. आज मुंब्र्यात ठाकरे-शिंदे आमने सामने येणार आहेत. उद्धव ठाकरे मुंब्र्यासाठी रवाना झालेत. त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलंय. कार्यकर्त्यांनी सुद्धा मुंब्र्यातील शाखेबाहेर प्रचंड गर्दी केलीये. शिंदे गट आणि ठाकरे गट, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी इथे गर्दी केलीये.

Published on: Nov 11, 2023 05:25 PM