Uddhav Thackeray | रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल

Uddhav Thackeray | रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल

| Updated on: Jan 17, 2026 | 6:24 PM

महापालिका निवडणुक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षानंतर पहिल्यांदा शिवाजी पार्कवर एकत्र आले होते यावर भाष्य करत ठाकरे म्हणाले 'त्यावेळी शिवाजी पार्क फुलून गेलं होतं' दुसऱ्या दिवशी खुर्च्यांची जी काय गर्दी होती त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही.

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलं होतं. मुंबईमध्ये देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलं नाही, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची या निकालावर पहिली पत्रकार परिषद घेत, प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षानंतर पहिल्यांदा शिवाजी पार्कवर एकत्र आले होते यावर भाष्य करत ठाकरे म्हणाले ‘त्यावेळी शिवाजी पार्क फुलून गेलं होतं’ दुसऱ्या दिवशी खुर्च्यांची जी काय गर्दी होती त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे ‘आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही’ पण ‘विरोधकांकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्यांदाच आम्हाला समजलं’ रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? असा प्रश्न उपस्थित करत, ‘हे एक न उलगडलेलं कोडं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीला टोला लगावला आहे.

Published on: Jan 17, 2026 06:24 PM