सुषमा अंधारे मारहाण प्रकरण, ‘त्या’ जिल्हाप्रमुखावर उद्धव ठाकरे यांची मोठी कारवाई

| Updated on: May 19, 2023 | 9:30 AM

VIDEO | सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा अन् बीडमधील राड्यानंतर उद्धव ठाकरे यांची मोठी कारवाई

Follow us on

बीड : ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा उद्या बीडमध्ये होणार आहे. या यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गुरूवारी या सभेच्या निमित्ताने सुषमा अंधारे सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह सुषमा अंधारे यांचा वाद झाला. यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे. मी दोन फटके मारल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर जिल्हासंपर्क प्रमुख धोंडू पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोन्ही जिल्हाप्रमुखांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा केला होता. यासह सुषमा अंधारे यांनी पक्षात दमदाटी सुरू केली आहे. त्या सतत पैसे देखील मागत आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केलाय.