Ayodhya Poul : …त्यावर मी ठाम, संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा अन् ‘त्या’ Audio वर अयोध्या पौळ स्पष्ट म्हणाल्या…

Ayodhya Poul : …त्यावर मी ठाम, संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा अन् ‘त्या’ Audio वर अयोध्या पौळ स्पष्ट म्हणाल्या…

| Updated on: Jul 01, 2025 | 3:50 PM

संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याने अयोध्या पौळ यांना कॉल केला. त्यावर अयोध्या म्हणाल्या कोण बोलत आहे जरा लवकर बोला. त्यावर संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यानं एका पोस्टबद्दल विचारणा केली. त्यावर बोलताना अयोध्या पौळ चांगल्याच भडकल्या.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप सकाळपासून चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये अयोध्या पौळ यांनी मंत्री संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषाच थेट वापरल्याचे दिसून आले. मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याला बोलताना अयोध्या पौळ यांनी संजय राठोड यांना चपलेने मारण्याचा उल्लेख केला आहे. मात्र व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. अशातच अयोध्या पौळ यांनी स्वतः टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना या व्हायरल ऑडिओवर सवाल केला असता त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.

‘संजय राठोड यांचा एक फोटो माझ्याकडे आला. ज्यात ते तुळशीमाळ अन् वारकरी, साधूसंतांसारख्या वेशात दिसताय. यावर एक पोस्ट केली. यानंतर राठोड यांच्या बीडमधील एका कार्यकर्त्यांनी मला फोन केला.’, असं म्हणत जे ऑडिओमध्ये बोलणं झालं त्यावर ठाम असल्याचे पौळ यांनी सांगितले.

Published on: Jul 01, 2025 03:50 PM