Udhav Thackeray : ‘यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे’, उद्धव ठाकरेंची टीका

Udhav Thackeray : ‘यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे’, उद्धव ठाकरेंची टीका

| Updated on: Apr 03, 2025 | 1:21 PM

Udhav Thackeray Press Conference : उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्या आहेत. पण यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे. गरीब मुस्लिमांबाबत यांच काय धोरण आहे? अशी उपरोधक टीका आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर केली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, ३७० कलमाला आम्ही पाठिंबा दिलो होता. काश्मीरमधील अनेक निर्वासित इकडे तिकडे फिरत होते. त्यांना शिवसेना प्रमुखांनी आसरा दिला. ३७० कलम हटवलं. किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झालं. त्यांना किती त्यांच्या जमिनी दिल्या . काश्मिर पंडितांना त्यांच्या घरी का जाता येत नाही, यावर त्यांनी उत्तर द्याव. यांचा जमिनीवर डोळा आहे. देशातील इतिहासात मुस्लिमांचा कळवळा घेणारी भाषण भाजपने केली. अमित शाहपासून सर्वांनी केली. जिनांनाही लाजवेल ही भाषणे होती. हे मुस्लिमांच्या बाजूने आहेत की नाही. मग हिंदुत्वाचं काय झालं. हिंदूत्व सोडलं का? बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती. तीच जागा व्यापाऱ्यांसाठी उद्योगपतीच्या खिशात घातली. किरेन रिजिजूपासून सर्व खाली मान घालून बघत होते. हे काय चाललंय. मुस्लिमांच्या हिताचं हे बिल आहे का. असेल तर मग हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही सोडलंय? असा प्रश्न देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Apr 03, 2025 01:20 PM