Uddhav Thackeray : हुजरेगिरी… दिल्लीचेही बुट चाटतो अन्.. ठाकरे यांची शिंदे यांच्यावर जिव्हारी टीका, भाजपलाही चॅलेंज

Uddhav Thackeray : हुजरेगिरी… दिल्लीचेही बुट चाटतो अन्.. ठाकरे यांची शिंदे यांच्यावर जिव्हारी टीका, भाजपलाही चॅलेंज

| Updated on: Nov 21, 2025 | 9:34 AM

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत मुंबई महानगरपालिका जिंकणारच असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला आहे. “दिल्लीचेही बूट चाटणारे, मुजरे करणारे बाळासाहेबांचे विचार पुढे काय नेणार?” अशा तिखट शब्दांत ठाकरे यांनी शिंदेंवर टीका केली. त्यांनी भाजपला अमिबाची उपमा देत, त्याला आकार नाही, उकार नाही, काही नाही, असे म्हटले. आत्ताचा भाजप हा विचित्र झाला असून, जुना भाजप वेगळा होता असेही ठाकरे यांनी नमूद केले. ते म्हणाले, “सगळे काही चोरायचे आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचे ही खोटी लोकशाही आहे, ती देशातील जनता स्वीकारणार नाही.” आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजय मिळवेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि आम्ही जिंकणारच,” असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.

या टीकेला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयावर विश्वास व्यक्त केला. लोकसभेत आणि विधानसभेत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीच जिंकेल असे शिंदे म्हणाले. महायुतीला शेतकरी, भगिनी आणि सर्वसामान्य जनतेने मतदान केले, त्यामुळेच हा विजय मिळाला असे त्यांनी अधोरेखित केले.

Published on: Nov 21, 2025 09:34 AM