Uddhav Thackeray : हिंदुत्व, ठाकरे ब्रँड अन् हिंदू अस्मिता… ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर  हिरव्या सापांच्या मागे… म्हणत पलटवार

Uddhav Thackeray : हिंदुत्व, ठाकरे ब्रँड अन् हिंदू अस्मिता… ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे… म्हणत पलटवार

| Updated on: Jul 20, 2025 | 11:21 AM

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली ज्यामध्ये हिंदुत्वावरून घेरणाऱ्या भाजपाला उद्धव ठाकरेंनी डिवचलंय. ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू अस्मितेची ओळख आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी सामन्याला मुलाखत दिली आणि त्यातून शिंदेंवर हल्लाबोल करतानाच ठाकरे ब्रँड म्हणजे हिंदू अस्मितेची ओळख आहे असं म्हटलंय. म्हणजेच उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडला हिंदुत्वाशी जोडून महायुती विशेषतः भाजपाला डिवचलंय कारण हिंदुत्व सोडलं असं म्हणत ठाकरेंना भाजप टार्गेट करतंय. शिंदेंच्या शिवसेनेला विधानसभेत 50 पेक्षा जागा मिळाल्या त्यावरून राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला त्यावर विधानसभेला शिंदेंनी डायनासोरच कापला असेल, अशी बोचरी टीका ठाकरेंनी केलीये. विधानसभेत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष 50 च्या आत आले जागा वाटपावरून झालेली रस्सीखेच आणि लोकसभेचे यश डोक्यात गेल्यानं पराभव झाला, हेही उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. दरम्यान, नुकताच उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग समोर आलाय. आता मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ते राज ठाकरेंच्या युतीवरून बोलणार आहेत ज्याचा टीझर संजय राऊतांनी ट्वीट केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 20, 2025 11:21 AM