Walmik Karad :  एकाला हालहाल करून मारलं, दुसऱ्याच्या शरीराचे तुकडे.. बीडमध्ये 2 क्रूर हत्या अन् आका गोत्यात

Walmik Karad : एकाला हालहाल करून मारलं, दुसऱ्याच्या शरीराचे तुकडे.. बीडमध्ये 2 क्रूर हत्या अन् आका गोत्यात

| Updated on: Jul 31, 2025 | 8:42 AM

बीडमधील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोन्ही हत्यांवरून तपास यंत्रणांवरचा दबाव आता वाढू लागलाय. एकीकडे देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय तर दुसरीकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत.

हातात नैवेद्याचं ताट घेत एका घरासमोर राम नाम सत्य म्हणणारा वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गित्ते…हाच तोच व्यक्ती आहे ज्याचा महादेव मुंडे हत्येप्रकरणात पोलीस शोध घेतायत. या आधी सुद्धा कागदोपत्री फरार असणारा गोट्या गित्ते बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वावरत असल्याचा दावा केला जातोय. पण तो पोलिसांच्या हाती काही लागत नाही हे सुद्धा वास्तव आहे. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांच्या क्रूर हत्येत अनेक साम्य आहेत. देशमुखांनी गावातल्या पवनचक्की प्रकल्पातून खंडणी उकळण्यास विरोध केला म्हणून त्यांना हालहाल करून मारलं गेलं आणि महादेव मुंडेनी १८ गुंठे जमीन विकण्यास नाही म्हटल्याने त्यांच्याही शरीराचे तुकडे केले गेले. या दोन्ही हत्यामध्ये आरोपांची सूई वाल्मिक कराडकडे जातेय. मात्र महादेव मुंडे हत्येत संशयित आरोपी गोट्या गित्ते अजुनी फरार आहे. तर देशमुख हत्येतील कृष्णा आंधळे अजून फरार आणि संतोष देशमुख हत्येतील कृष्णा आंधळेच नेमकं काय झालं हे अजूनही समोर आलेलं नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 31, 2025 08:42 AM