उत्तरप्रदेशातील संत, महंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं धनुष्यबाण अन् गदा

| Updated on: Apr 09, 2023 | 6:00 PM

VIDEO | अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत आणि महंतांना दिली धनुष्यबाण अन् गदा अशी खास भेट

Follow us on

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी आयोध्यातील रामलल्लाचा दर्शनही घेतले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण किल्ल्यावर भेट दिली आहे. यावेळी लक्ष्मण किल्ल्यावरील महंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. या स्वागतानंतर त्यांना धनुष्यबाण आणि मोठी गदा भेट देण्यात आली. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी लक्ष्मण किल्ल्यावर वेगवेगळ्या उत्तर प्रदेशातील पिठातील संत महंत दाखल झाल होते. यासर्व संत महंतांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार देखील करण्यात आला. तर एकनाथ शिंदे अयोध्येच्या दौऱ्यावर असताना अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा बाण भेट म्हणून देण्यात आला. हा धनुष्यबाण २ तोळ्याचा असून राम मंदिराला ते भेट दिला आहे. दरम्यान, विदर्भातील शिवसेनेचे नेते किरण पांडव यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर धनुष्यबाण भेट देण्याचा नवस केला होता. हा नवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल झाल्यानंतर त्यांच्या हस्ते फेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होतं.