LPG सिलेंडर ते UPI, PF पर्यंत…1 जूनपासून पैशांशी संबंधित ‘या’ 8 नियमांत होणार बदल

LPG सिलेंडर ते UPI, PF पर्यंत…1 जूनपासून पैशांशी संबंधित ‘या’ 8 नियमांत होणार बदल

| Updated on: May 31, 2025 | 3:23 PM

1 जून 2025 पासून आर्थिक सेवा क्षेत्राशी संबंधित आणि ऑनलाईन व्यवहारासंदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. कोणते आहे ते जाणून घ्या...

युपीआय, पीएफ, एलपीजी सिलेंडरबाबतचे नियम हे 1 जूनपासून बदलणार आहेत. उद्यापासून आठ मोठे नियम लागू होणार आहेत. या नियम बदलामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे

1 जूनपासून हे 8 बदल होणार

सरकार ईपीएफओची नवीन आवृत्ती ईपीएफओ 3.0 लाँच करणार आहे. तर पीएफ क्लेम खूप सोपा होणार असून एटीएम आणि युपीआय मधून सुद्धा पैसे काढता येणार आहेत.

यासह मोफत आधार अपडेट सुविधा संपली असून आता आधार अपडेटसाठी 50 रुपये निश्चित करण्यात आलाय.

कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचा ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाल्यास 2 टक्के बाउन्स शुल्क आकारण्यात येईल

सीएनजी पीएनजी आणि एटीएफच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती प्रति सिलेंडर 17 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्यात

रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये कपात केलेली आहे आणि आणखी कपात अपेक्षित आहे.

सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनेसाठी लागू केलेला नवीन कट ऑफ वेळ लागू होणार आहे.

युपीआय पेमेंट करताना वापरकर्त्याला फक्त बँकिंग नाव दिसेल क्यू आर कोड संपादित दिसणार नाही

Published on: May 31, 2025 03:23 PM