Pahalgam : पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास अमेरिकेचा ग्रीन सिग्नल? अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य, ‘अ‍ॅक्शन घ्यावी, पण…’

Pahalgam : पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास अमेरिकेचा ग्रीन सिग्नल? अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य, ‘अ‍ॅक्शन घ्यावी, पण…’

| Updated on: May 02, 2025 | 1:02 PM

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेल्याचे पाहायला मिळतंय. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी व्हान्स यांनी तणाव निवळवण्याच्या संदर्भाने एक भूमिका मांडली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील तणाव हा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळतंय. भारताने पाकविरोधात अनेक कठोर पाऊलं उचलल्यानंतर आता भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करेल याची धडकी पाकिस्तानने घेतली आहे. अशातच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास अमेरिकेकडून भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. तर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांविरोधात अ‍ॅक्शन घ्यावी. ही अ‍ॅक्शन घेताना क्षेत्रिय युद्ध भडकू नये, याची काळजी घ्यावी, असं वक्तव्य अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स यांनी केल्याचे पाहायला मिळतंय. फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स यांनी असं म्हटलंय.

Published on: May 02, 2025 01:01 PM