Solapur Crime News : महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

Solapur Crime News : महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

| Updated on: Mar 31, 2025 | 11:53 PM

Criminal Arrested For Burglary : सोलापूर पोलिसांनी एका घरफोडी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. हा आरोपी चक्क उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात विमानाने येऊन घरफोडी करायचा.

उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे हा संशयित गुन्हेगार उत्तर प्रदेशातून चक्क विमानाने महाराष्ट्रात येऊन रेल्वेने सोलापूर गाठायचा. त्यांनंतर तिथे घरफोडी करायचा. अनिल कुमार राजभर असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. हा संशयित गुन्हेगार लखनऊमध्ये तब्बल 1 कोटींच्या बंगल्यात राहायचा. सोलापुरात शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून परतत असताना सोलापूर गुन्हे शाखेने या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Published on: Mar 31, 2025 11:53 PM