Vaishnvi Hagawane Case : वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी

Vaishnvi Hagawane Case : वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: May 28, 2025 | 5:52 PM

Rajendra Hagwane police remand : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे पिता पुत्राला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. यावेळी त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे.

वैष्णवी हगवणेचा दीर सुशील आणि सासरा राजेंद्र हगवणे याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज हगवणे कुटुंबाची कोठडी संपल्यानंतर त्यांना पुण्याच्या शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. त्यानंतर या दोघांना आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून 16 मे रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या माहेरच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहेत. वैष्णवीचा प्रेम विवाह शशांक हगवणेशी झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची ती सून होती. या घटनेनंतर राजेंद्र हगवणेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या हगवणे कुटुंब बावधन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांची कोठडी आज संपल्यावर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं.

Published on: May 28, 2025 05:50 PM