Vaishnavi Hagawane Case : कपडे फाडले, सासऱ्यानं सूनेच्या छातीवर… मयुरीच्या आईची 7 महिन्यांपूर्वीच महिला आयोगात तक्रार, पत्रात काय म्हटलं?

Vaishnavi Hagawane Case : कपडे फाडले, सासऱ्यानं सूनेच्या छातीवर… मयुरीच्या आईची 7 महिन्यांपूर्वीच महिला आयोगात तक्रार, पत्रात काय म्हटलं?

| Updated on: May 24, 2025 | 5:08 PM

18/02/2024 ला पौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. मयुरीला सोडावं म्हणून तिच्या पतीच्या मागेही तगादा लावायचे. मयुरीचा पती नकार देत असल्यामुळे त्याचा रागही मयुरीवर काढायचे. 6 नोव्हेंबर 2024 ला पती घरात नसताना मयुरीला बेदम मारहाण झाली.

वैष्णवी हगवणेची मोठी सून मयुरी जगताप हगवणे यांच्या आईने राज्य महिला आयोगाकडे सात महिन्यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती. हागवणे कुटुंबानं मयुरीला दिलेल्या यातनांसंदर्भात पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये हे पत्र लिहिण्यात आलं होतं मात्र पत्रावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग आता चांगलंच गोत्यात आलं आहे.

वैष्णवी प्रमाणे मोठी सून मयुरी हगवणे हिला हगवणे कुटुंबाने किती नरकयातना दिल्या, याचं पत्र मयुरी जगतापच्या आईकडून राज्य महिला आयोगाला देण्यात आलं होतं. यापत्रात त्यांनी हगवणे कुटुंबीयांकडून मयुरीला देण्यात आलेल्या नरकयातनांचा पाढाच वाचलाय. 6 नोव्हेंबरला हे पत्र लिहिलं मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. 20 मे 2022 ला मयुरीचं सुशील सोबत लग्न झालं. यानंतर पैसे आणि महागड्या वस्तूंच्या मागणीचा सपाटा लावला. आमच्याकडे बंदूक आहेत, तुझी आई आणि दिव्यांग भावाला मारून टाकू अशी धमकी दिली. माझा मेव्हणा मोठा पोलीस अधिकारी आमच्यामागे राजकीय पाठिंबा असं म्हणत दमदाटी केली. बघा पत्रात नेमकं काय म्हटलंय?

Published on: May 24, 2025 04:46 PM