Vaishnavi Hagawane Case : ती गेली तरी तिला अजून किती त्रास देणार? तान्ह्या नातवासाठी वैष्णवीचं कुटुंब चिंतेत

Vaishnavi Hagawane Case : ती गेली तरी तिला अजून किती त्रास देणार? तान्ह्या नातवासाठी वैष्णवीचं कुटुंब चिंतेत

| Updated on: May 22, 2025 | 1:00 AM

Vaishnavi Hagawane Death Case Updates : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तीच बाळ कुठे आहे याबद्दल आता तिचं कुटुंब चिंतेत आहे. आमचा नातू आम्हाला परत द्या अशी मागणी त्यांच्याकडून वारंवार पोलिसांना करण्यात येत आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. वैष्णवी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून होती. सासरच्या मंडळींकडून तिचा हुंड्यासाठी छळ केला गेला आणि त्यातूनच तिची हत्या केली असं तिच्या कुटुंबाचं म्हणण आहे. हगवणे कुटुंबावर वैष्णवीच्या कुटुंबाने काही गंभीर आरोप देखील केलेले आहेत. मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूनंतर तीच तान्हं बाळ नेमकं कुठे आहे? याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल बोलताना मृत वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी पुनः एकदा हगवणे कुटुंबावर आरोप केलेल आहेत.

नातवाला आणण्यासाठी बाळाचे आजोबा (वैष्णवीचे चुलते) गेल्यानंतर निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीं पिस्तुल दाखवून त्यांना धमकवल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. तसंच वैष्णवीच्या आई- वडिलांनी तिच्या नऊ महिन्यांच्या नातवाबाबत चिंता व्यक्त केली आहे. आमचा नातू आम्हाला परत आणून द्यावा, अशी विनंती पोलिसांना अनिल कस्पटे यांनी केली आहे. आमची मुलगी गेली, तिचा जीव तिच्या बाळात होता. उद्या माझ्या मुलीला जाऊन 10 दिवस होतील. तेव्हा आम्हाला तिचं बाळ तिथे लागेल. आता तिचा जीव गेला तरी अजून किती तिला त्रास देणार? असा भावनिक प्रश्न देखील वैष्णवीच्या वडिलांनी यावेळी केला आहे.

Published on: May 22, 2025 12:55 AM