Vasant More : राजकारणाची चीड यायला लागलीय, प्रभाग रचनेवरून वसंत मोरेंची राज्य सरकारवर टीका

| Updated on: Aug 05, 2022 | 2:11 PM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर महापौरांची (Mayor) निवडही जनतेतून करावी, असे आव्हान वसंत मोरे यांनी दिले आहे. तर कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल, असा विश्वास मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केला.

Follow us on

पुणे : मागील वेळी चार सदस्यीय प्रभाग (Ward) रचना होती. ती बदलून तीन सदस्यीय करण्यात आली. त्यात बराच वेळ गेल्यानंतर आता पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या प्रभाग रचनेच्या निर्णयावरून वसंत मोरेंनी (Vasant More) राज्य सरकारवर टीका केली आहे. राजकारणाची चीड यायला लागली आहे. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलतो आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी राज्य सरकारवर केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर महापौरांची (Mayor) निवडही जनतेतून करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तर कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल, असा विश्वास मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केला.