सोलापूरच्या निमगावच्या 200 वर्ष जुन्या वावडी महोत्सवात शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ
VIDEO | सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील निमगावामध्ये वावडी महोत्सवाचा मोठा उत्साह, निमगावच्या 200 वर्ष जुन्या वावडी महोत्सवातील मर्दानी खेळ पाहण्यासाठी राज्यातील तरूणांची गर्दी
सोलापूर, २८ ऑगस्ट २०२३ | माळशिरस तालुक्यातील निमगावात वावडी महोत्सव भरवण्यात आला आहे. वावडी म्हणजे एक प्रकारचा मोठा पतंग असतो. सुमारे दोनशे वर्षे जुना इतिहास असणारा कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ म्हणून वावडी कडे पाहिले जाते. हल्ली वावडी हा खेळ लोप पावत चालला आहे. मात्र माळशिरसमध्ये महोत्सव घेऊन वावडी खेळ खेळला जातो. हा खेळ पाहण्यासाठी सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी गर्दी केली होती. माळशिरस येथे नागपंचमीनिमित्त अनेक पिढ्यांपासून 5 फुटापासून ते 30 फुटापर्यंतच्या वावड्या तयार करणे आणि त्या उडविणे हा अनोखा व पारंपारिक खेळ खेळला जातो. निमगावच्या 200 वर्ष जुन्या वावडी महोत्सवातील शेतकऱ्यांच्या मर्दानी खेळाची संपूर्ण राज्यभरात होताना दिसतेय विशेष म्हणजे सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील तरुण या महोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात.
Published on: Aug 28, 2023 04:05 PM
