Ambadas Danve | वेदांताच्या यादीत कुठेच नाव नव्हते, मग प्रकल्प गुजरातला कसा गेला? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल
प्रकल्प गुजरातलाच का हलवला?
Image Credit source: tv9 marathi

Ambadas Danve | वेदांताच्या यादीत कुठेच नाव नव्हते, मग प्रकल्प गुजरातला कसा गेला? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल

| Updated on: Sep 15, 2022 | 6:28 PM

Ambadas Danve | वेदांताच्या यादीत कुठेच नाव नसताना हा प्रकल्प गुजरातला कसा हलवण्यात आला , असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे.

Ambadas Danve | वेदांताच्या (Vedanta)यादीत कुठेच नाव नसताना हा प्रकल्प गुजरातला कसा हलवण्यात आला , असा सवाल विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी विचारला आहे. वेदांताच्या यादीत कर्नाटक आणि तेलंगणाचे नाव होते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण मुंबईतील कार्यालये गुजरातमध्ये पळवण्यात येत आहे. हिरे बाजार पळवण्यात आला. विमान कंपनीचे कार्यालय आणि इतर अनेक ऑफिसेस पळवण्यात आली. त्याला सध्याचे सरकार कारणीभूत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

गुजरातमध्ये कुठे आहेत सुविधा

महाराष्ट्रात पुण्याजवळील तळेगाव येथे वेदांता कंपनीसाठी ज्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्या गुजरातमध्ये (Gujrat ) बिलकूल नाही. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला कसा हलवला हा सवाल उठतो, असे ते म्हणाले. सध्याचं राज्य सरकार मूग गिळून या निर्णयाला पाठिंबा देत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.

 

Published on: Sep 15, 2022 06:28 PM