Mumbai CNG shortaget : मुंबईत सीएनजी गॅसचा तुटवडा, पंपांवर लांबच लांब रांगा, मुंबईकरांना मोठा फटका

Mumbai CNG shortaget : मुंबईत सीएनजी गॅसचा तुटवडा, पंपांवर लांबच लांब रांगा, मुंबईकरांना मोठा फटका

| Updated on: Nov 18, 2025 | 11:06 AM

मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने आणि रेल्वे रुळाला तडा गेल्याने दोन्ही शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकरांना कामावर पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने आणि रेल्वे रुळाला तडा गेल्याने दोन्ही शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकरांना कामावर पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. सीएनजी गॅस पाईपलाईन बिघाडामुळे शहरातील अनेक सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबरसारख्या सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक रिक्षाचालकांना सीएनजी न मिळाल्याने त्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

कुर्ला, दादर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर तसेच बीकेसी (Bandra Kurla Complex) आणि कोहिनूर सिटीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना ऑटो-रिक्षा मिळण्यास अडचणी येत आहेत. ठाण्यातील महानगर सीएनजी गॅस पंपावरही अर्धा ते एक किलोमीटर लांबीच्या रिक्षांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यात सीएनजी पुरवठा विस्कळीत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी ऑफलाइन सीएनजी पंपांवर पुरवठा बंद झाला आहे.

Published on: Nov 18, 2025 11:06 AM