Video | अफगाणिस्तानात राहून तालिबानशी दोन हात, कोण आहेत उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह ?

Video | अफगाणिस्तानात राहून तालिबानशी दोन हात, कोण आहेत उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह ?

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 10:03 PM

15 ऑगस्टला जेव्हा तालिबानने काबूलच्या दिशेने चाल केली होती तेव्हा राष्ट्रपती अश्रफ गनींसह अनेक मंत्र्यांनी परदेशात पळ काढला. अश्रफ गनींना यूएईने शरणात घेतलं. त्याचवेळी देशातून कुठेही न जाता अमरुल्ला सालेह यांनी तालिबान्यांना थेट अंगावर घेतलं.

मुंबई :  15 ऑगस्टला जेव्हा तालिबानने काबूलच्या दिशेने चाल केली होती तेव्हा राष्ट्रपती अश्रफ गनींसह अनेक मंत्र्यांनी परदेशात पळ काढला. अश्रफ गनींना यूएईने शरणात घेतलं. त्याचवेळी देशातून कुठेही न जाता अमरुल्ला सालेह यांनी तालिबान्यांना थेट अंगावर घेतलं. अमरुल्ला सालेह देशातच राहिले. देशात राहून त्यांनी आधी स्वत:ला राष्ट्रपती घोषित केलं.  त्याचबरोबर ”अफगाणिस्तानच्या संविधानानुसार, राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत, पळण्याच्या घटनेत, राजीनामा वा त्यांचा मृत्यू झाल्यास उपराष्ट्रपती हेच हंगामी राष्ट्रपती असतात. मी सध्याच्या परिस्थितीत देशातच आहे, आणि संविधानानुसार राष्ट्रपतीही मीच आहे. मी सगळ्या नेत्यांना एकत्र करतोय, आणि त्यांचं समर्थन मिळवतोय.” असं ट्विटर करुन त्यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले. सालेह यांच्या याच भूमिकेमुळे सध्या काबुलमधील सालेह हे नेमके कोण आहेत, याची चर्चा होत आहे. (Vice President Amrullah Saleh fighting against Afghan Taliban know all about Amrullah Saleh)

पंजशीरमध्ये वास्तव्य करुन तालिबानशी दोन हात

सालेह यांनी पंजशीरमध्ये मुक्काम ठोकलाय. याच पंजशीरमध्ये सैन्यअधिकारी आणि तालिबानच्या तावडीतून पळालेले सैनिक पुन्हा एकवटताहेत. पण पंजशीर इतका लढवय्या बनला तो अहमद शाह मसूद यांच्यामुळे.अवघ्या काही लोकांच्या बळावर, गनिमी काव्याच्या मदतीने मसूद यांनी या प्रांताला अजेय बनवलं. सोवियत रशियाने या प्रांतावर 9 वेळा हल्ला केला. तालिबानाने रणगाड्यांसह अनेकदा आक्रमणं केली. पण, ही भूमी त्यांची स्मशानभूमीच ठरली. 1995 मध्ये याच भूमीतील मसूद यांनी थेट तालिबान्यांना काबूलमधून पळता भूई थोडी केली होती. सध्या याच प्रांतात सालेह यांनी मुक्काम ठोकला आहे.

इतर बातम्या :

तळीयेतील दरडग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या ‘म्हाडा’च्या घरांना शिवसेना आमदाराचा विरोध, कारण काय?

केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेत छोट्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचं आवाहन

अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला

(Vice President Amrullah Saleh fighting against Afghan Taliban know all about Amrullah Saleh)

Published on: Aug 19, 2021 09:37 PM