Nagpur News : पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
Vidarbha Petroleum Sealers Association : विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने 10 मे पासून ऑनलाइन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे ग्राहकांचे हाल होणार आहेत.
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने 10 मे पासून ऑनलाइन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा ग्राहकांना मात्र चांगलाच त्रास होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत देशभरात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात काही. बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. या निर्णयाने नागरिक मात्र नाराज झाले आहे.
Published on: May 04, 2025 02:44 PM
