Chiplun Flood | चिपळूणमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, मुख्यमंत्र्यांकडून चिपळूणमधल्या नुकसानीची पाहणी

Chiplun Flood | चिपळूणमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, मुख्यमंत्र्यांकडून चिपळूणमधल्या नुकसानीची पाहणी

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 2:17 PM

मुसळधार पावसामुळे चिपळूनमध्ये पूरस्थिती आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत.

मागील काही दिवस कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं . त्यामुळे कोकणच्या चिपळूण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याठिकाणी पोहचले आहेत. यावेळी ठाकरेंनी चिपळूनच्या जनतेशी संवाद साधत बाजारपेठेची पाहणी केली. दरम्यान स्थानिकांनी ‘आम्हाला मदत करा’ असा आक्रोश मुख्यमंत्र्यासमोर केला.