महादेव मुंडे हत्याकांड हे दुहेरी हत्याकांड; विजयसिंह बांगर यांचा खळबळजनक आरोप

महादेव मुंडे हत्याकांड हे दुहेरी हत्याकांड; विजयसिंह बांगर यांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Jul 17, 2025 | 5:48 PM

वाल्मिक कराड आणि टोळीने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला संपवलं असल्याचा आरोप विजयसिंग बांगर यांनी केला आहे.

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत काल महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू आहेत. आज पुन्हा एकदा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतली. यानंतर मिडीयाशी संवाद साधताना त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला वाल्मिक कराड आणि प्रशासनातील टोळीने संपवलं असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. तसेच वाल्मिक कराडने जेलमध्ये गेल्यापासून 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन केला ते सध्या बाहेर आहेत. आणि वाल्मिक कराड हा जेलमधून अंडरवर्ल्ड बीड जिल्ह्यात चालवत आहे. असे धक्कादायक खुलासे त्यांनी केले आहेत तर पोलीस प्रशासना समोर चॅलेंज आहे त्यांनी यामध्ये तळागाळापर्यंत तपास करावा अशीही मागणी विजयसिंह बांगर यांनी केली आहे.

Published on: Jul 17, 2025 05:48 PM