Congress Video : भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी सदैव तयार अन् दुर्मिळ इनकमिंग असताना काँग्रेसकडे प्रवेशाच्या उपरण्याचा दुष्काळ!

Congress Video : भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी सदैव तयार अन् दुर्मिळ इनकमिंग असताना काँग्रेसकडे प्रवेशाच्या उपरण्याचा दुष्काळ!

| Updated on: Nov 13, 2025 | 11:39 PM

काँग्रेसमधील पक्षप्रवेशाच्या व्हायरल व्हिडिओमुळे पक्षप्रवेशावेळी उपरण्यांच्या कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात उपरणी अपुरी पडल्याचे दिसून आले. १० वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसच्या आर्थिक स्थितीवर या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले असून भाजपशी तुलना होत आहे.

काँग्रेसमधील मोठ्या गळतीनंतरही काही नवीन पक्षप्रवेश नुकतेच झाले. मात्र, या पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेसकडे पुरेसे उपरणे (शाल) उपलब्ध नाहीत का, असा प्रश्न एका व्हायरल व्हिडिओमुळे विचारला जात आहे. मुंबईत झालेल्या एका काँग्रेस पक्षप्रवेश कार्यक्रमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाची बातमी दुर्मिळ असताना, जे नव्याने पक्षात आले आहेत, त्यांच्या प्रवेशासाठीही काँग्रेसकडे पुरेसे उपरणे नसावेत का, असा सवाल या व्हिडिओद्वारे उपस्थित केला जात आहे.

व्हिडिओनुसार, एका पक्षप्रवेशावेळी अमित देशमुख यांनी डाव्या बाजूकडून उपरणे घेऊन प्रवेश केला. दुसऱ्या प्रवेशासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना समोरून उपरणे मागवून घ्यावे लागले. तर, तिसऱ्या पक्षप्रवेशावेळी बाजूच्याच व्यक्तीच्या खांद्यावरून उपरणे काढून वापरण्यात आले. १० वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या पक्षाला आर्थिक चणचण असणे मान्य आहे. मात्र, नियोजित पक्षप्रवेशासाठी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातही पुरेसे उपरणे उपलब्ध नसावेत, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. ही परिस्थिती काँग्रेसच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकते.

Published on: Nov 13, 2025 11:39 PM