Vishal Gawali Death : माझा मुलगा आत्महत्या करणार नाही, त्याला फसवलं.. ; आरोपी विशाल गवळीच्या आईने केला मोठा आरोप
Kalyan Minor Rape Accused Death : कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने आज आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबाकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला जात आहे.
सकाळी कारागृहातून फोन आला की विशालने आत्महत्या केली, असं विशालच्या आई – वडिलांनी सांगितलं आहे. मात्र त्याची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप विशालच्या घरच्यांनी केला आहे. कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील विशाल गवळी हा आरोपी होता. आज पहाटे त्याने तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र विशाल आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आलेली आहे, त्याला फसवलं गेलं आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Published on: Apr 13, 2025 01:14 PM
