Uday Samant : मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची राऊतांवर टीका
Uday Samant On Sanjay Raut : मुस्लिम समाजात गैरसमज पसरवण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीकडून सुरू असल्याचं नेते उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.
वक्फ सुधारणा विधेयकामुळे अनेक मतं महायुतीला जातील याची खासदार संजय राऊत यांना भीती वाटत असल्याचा आरोप नेते उदय सामंत यांनी केला आहे. राऊतांच्या आरोपात काहीही अर्थ नसल्याची टीका देखील सामंत यांनी यावेळी केली आहे. मुस्लिम समाजात गैरसमज पसरवण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीकडून सुरू असल्याचं देखील यावेळी उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, या आरोपांना काहीही अर्थ नाही. सर्वसामान्य मुस्लिम समाजाने या बिलाचं स्वागतच केलं आहे. ज्या लोकांना असं वाटत आहे की, आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मतं या बिलानंतर पुन्हा एकदा महायुतीकडे जाणार आहेत ते लोक भीतीपोती मुस्लिम समाजात गैरसमज पसरवत आहेत, अशी टीका सामंत यांनी यावेळी केली आहे.
Published on: Apr 07, 2025 12:40 AM
