Sindhudurg : अद्भूत… आंबोलीतील सौंदर्याला तोड नाही, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच

Sindhudurg : अद्भूत… आंबोलीतील सौंदर्याला तोड नाही, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच

| Updated on: Jul 15, 2025 | 1:36 PM

आंबोली हे कोकणातील एक सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण ब्रिटिश काळात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. येथे निसर्गाची खूप सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. नुकताच तेथील एक सौंदर्याचा नजारा समोर आलाय.

सध्या सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने निर्सगाचं वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाच्या दिशेने पर्यटकांकडे पाऊलं वळताना दिसताय. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच पाऊस होत असल्याने जणू डोंगरांनी हिरवागार शालूच पांघरल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच आकाशातून आलेली पांढऱ्याशुभ्र ढगांची चादर दाट धूके आणि उंचच्या उंच डोंगरांवरून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धबधब्यांमुळे कोकणातील निसर्गाचं सौंदर्य, रूप आणखीनच खुलल्याचे पाहायला मिळतंय हाच नजारा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे कैद करण्यात आला आहे. या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेल्या दृश्यांमध्ये हिरवाईने नटलेला निसर्गाचा नजारा पाहायला मिळतोय. हा सगळा नजारा डोळ्यांचे पारणं फेडणारा असल्याने हा व्हिडीओ एकदा बघाच…

Published on: Jul 15, 2025 01:36 PM