Eknath Shinde : दहीहंडी फोडण्यासाठी आमचे 50 गोविंदा होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले…

| Updated on: Aug 19, 2022 | 8:01 PM

गोविंदांना स्पोर्ट्सचा दर्जा मिळावा, अशी मागणी होती. ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. प्रो कबड्डीसारखं प्रो गोविंदांचं आयोजन मिरा भाईंदरमध्ये होणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार गीता जैन यांनी मिरा भाईंदरमध्ये संस्कृतीचं जतन केलं आहेत. यंदा जल्लोष जास्त दिसतोय. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळं जल्लोष कमी होता. दीड महिन्यांपूर्वी आम्ही मोठी दहीहंडी फोडली. हिंदुत्वाच्या विचारांची सरकार स्थापन झाली. नवी सरकार स्थापन झाली. 50 गोविंदा हंडीफोडसाठी उपस्थित होते. ती दहीहंडी ही 50 स्तरांची होती. सरकार सर्व लोकांची आहे. व्यापारी, कामगार, शेतकरी, गोविंदाची ही सरकार आहे. यावेळी सर्व मार्गावर जल्लोष दिसत आहे. या सणासाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली. हंडी फोडणाऱ्या जखमी गोविंदांसाठी मोफत उपचार होणार आहेत. गोविंदांना स्पोर्ट्सचा दर्जा मिळावा, अशी मागणी होती. ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. प्रो कबड्डीसारखं प्रो गोविंदांचं आयोजन मिरा भाईंदरमध्ये होणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक हेही यावेळी उपस्थित होते.