Shahu Maharaj on Devendra Fadnavis | संभाजीराजेंच्या त्या निर्णयामागे देवेंद्र फडणवीसच? पहा व्हिडीओ

| Updated on: May 28, 2022 | 8:34 PM

भाजपने जो राज्यात संभ्रम निर्माण केला होता, तो आता शाहु माहारांजानी दूर केला, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं आहे. तसेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी राजेंना पुढे करून मतांचं विभाजन करणे ही फडणवीसांची खेळी असल्याचे म्हटले होते. यावर आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र आता संभाजीराजेंच्या ट्विटने नवा संभ्रमही निर्माण झाला आहे.

Follow us on

कोल्हापूर: शिवसेनेने (shivsena)स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना उमेदवारी नाकारली. तर शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अनेक तर्क लढवले गेले. छत्रपती घराण्याने कोणत्याही पक्षात प्रवेश करणं योग्य नसल्यानेच संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचं सांगितलं जात आहे. तर, राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करण्यात काय अडचण होती? असा सवालही केला जात आहे. तर, संभाजीराजेंना अपक्ष म्हणून राज्यसभेला उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच होती, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी (shrimant Shahu chhatrapati) केला. तसेच संभाजीराजेंना तिकीट न मिळणं हा छत्रपती घराण्याचा अवमान म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.