Maharashtra Weather : कुठं तापमानात वाढ तर कुठं पावसाच्या सरी, पुढील काही दिवस राज्यात कसं असणार वातावरण?

Maharashtra Weather : कुठं तापमानात वाढ तर कुठं पावसाच्या सरी, पुढील काही दिवस राज्यात कसं असणार वातावरण?

| Updated on: May 02, 2025 | 5:02 PM

राज्यात विजेच्या कडकडाटासह पाऊसाची काही ठिकाणी नोंद झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे उत्तर ते दक्षिण दिशा असून तिथं आर्द्रता वाढली असल्याने तिथं पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत ४० ते ४२ तापमान हे वाढलं असून त्याचं मुख्य प्रमाण म्हणजे आर्द्रतेच कमी प्रमाण आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. तापमान हे ४० अंश च्या पुढे गेलेलं असून उन्हाचे चटके हे बसताना पाहायला मिळत आहे. तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होताना पाहायला मिळत आहे. तापमानातील या बदलाबाबत हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात एक ते तीन मे दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर चार मे ते सहा मे दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तापमानात वाढ तर काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात पुढे काही दिवस काय परिस्थिती असणार याबाबत बोलताना सानप म्हणाले, येणाऱ्या चार ते पाच दिवसांसाठी विदर्भात वादळी वाऱ्याचा पाऊस आणि सोसायट्यांच वारा असा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात चार तारखेपासून ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या जे तापमान वाढ आपल्याला पुण्यासह वेगवेगळया ठिकाणी पाहायला मिळत आहे ते कमी होताना पाहायला मिळणार आहे.

Published on: May 02, 2025 05:01 PM